FIFA World Cup : वर्ल्डकप संपताच एकाच रात्री गायब होणारा हा स्टेडिअम, जाणून घ्या कसं ते
FIFA World Cup Stadium 974: यंदाच्या फिफा वर्ल्डकपच (FIFA World Cup) यजमान पद कतारकडे होते. त्यामुळे कतारला वर्ल्ड कपला (qatar stadium) साजेशे स्टेडियम उभारावे लागले होते. काही स्टेडियम आधीच उभारले गेले होते, तर काही स्टेडियम कतारला उभारावे लागले होते.
FIFA World Cup Stadium 974: जगभरात फुटबॉलचा (FIFA World Cup) फिव्हर सुरु आहे. एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहेत. त्यात आता हा फिफा वर्ल्ड कप संपल्यानंतर 974 स्टेडियम (FIFA World Cup Stadium 974) पुर्णपणे गायब होणार आहे.मात्र इतका मोठा आणि अवाढव्य असणारा हा स्टेडिअम अचानक एकाच रात्री कसा गायब होणार, असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला आहे. तसेच या स्टेडियमची खासियत काय आहे, ते देखील जाणून घेऊयात.
यंदाच्या फिफा वर्ल्डकपच (FIFA World Cup) यजमान पद कतारकडे होते. त्यामुळे कतारला वर्ल्ड कपला (qatar stadium) साजेशे स्टेडियम उभारावे लागले होते. काही स्टेडियम आधीच उभारले गेले होते, तर काही स्टेडियम कतारला उभारावे लागले होते. दरम्यान कतारने वर्ल्ड कपसाठी सात स्टेडियम बांधले आहेत. या सात स्टेडियमपैकी एक संपूर्ण स्टेडियम हे स्पर्धेनंतर गायब होणार आहे. या स्टेडियमचे नाव 974 (FIFA World Cup Stadium 974) आहे.
स्टेडियमची खासियत?
कतारच्या या स्टेडियमचे नाव खुपच वेगळे आहे. या स्टेडियमचे नाव कतारचा आंतरराष्ट्रीय डायलिंग कोड आणि स्टेडियम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कंटेनरच्या संख्येवरून देण्यात आले आहे. त्यामुळे स्टेडियमचे नाव 974 (FIFA World Cup Stadium 974) आहे. दोहा येथे हा स्टेडियम उभारण्यात आला आहे. या स्टेडियम 974 च्या (FIFA World Cup Stadium 974) बांधकामात रंगबेरंगी शिपिंग कंटेनर वापरलेले आहेत. लाल, पिवळे आणि निळे बॉक्स विविध थरांमध्ये हा स्टेडियम उभारण्यात आला आहे. एकूणच काय तर हा खराखुरा स्टेडियम नाही आहे, कंटेनरच्या सहाय्याने याला स्टेडियमची रचना दिली गेली आहे. हा स्टेडियम स्पर्धेनंतर पूर्णपणे वेगळा करून गायब होणार आहे.
स्टेडियम गायब करण्याचा हेतू काय?
स्टेडियम डिझाईन करणाऱ्या फेनविक इरिबरेनने हा स्टेडियम गायब करण्या मागच कारण सांगितले की, दक्षिण आफ्रिका, रशिया व ब्राझील मधील वर्ल्ड कप स्पर्धेचे उदाहरण पाहता, नवे स्टेडियम उभारून पांढरा हत्ती पोसावा लागू नये. म्हणून हा स्टेडियम नव्याने न उभारता त्याला कंटेनरच्या सहाय्याने उभारण्यात आला होता.आता स्पर्धेनंतर तो मोकळा देखील होणार आहे.
दरम्यान स्टेडियम 974 वर्ल्ड कप (FIFA World Cup Stadium 974) स्पर्धेनंतर मोकळा करण्यात येणार आहे. जेणेकरून स्पर्धा संपल्यानंतर ही जागा पुन्हा वापरासाठी मोकळी होऊ शकेल.