Investigative law in Qatar: जगातील सर्वात लाडका खेळ मानला जाणाऱ्या फुटबॉलच्या फिफा वर्ल्ड कपला (FIFA World Cup) धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. यंदाचं यजमानपद कतारकडे देण्यात आलंय. कतार हा पहिला इस्लामिक देश (Islamic Country) आहे, ज्याच्याला वर्ल्ड कप आपल्या देशात खेळण्याचा मान मिळाला आहे. वर्ल्ड कपमुळे नाही तर सध्या कतार चर्चेत राहतोय तो निर्बंधांमुळे... एकीकडे सामन्यांची मजा घेण्यासाठी आलेल्या फॅन्सला अडचणींचा सामना करावा लागतोय. (fifa world cup physical relation outside of marriage is illegal in qatar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतारने फिफा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांवर अनेक बंधनं लादली आहेत. अविवाहित जोडप्यांना (Unmarried Couple) हॉटेल्स मिळणं अवघड झालंय तर, अनेक स्टेडियममध्ये बिअरवर बंदी देखील घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी (Unmarried couples in Qatar) विशिष्ट पद्धतीने कपडे घालण्याचे निर्बंध देखील लादण्यात आले आहेत.


अविवाहित जोडप्यांबद्दलचा कायदा चर्चेत -


Qatar Day च्या अहवालानुसार, कतारमध्ये अविवाहित जोडप्यांनी सोबत राहणं हे कायद्याच्या हिशोबात बसत नाही. एक पुरुष आणि स्त्री ज्यांचे कोणतेही कौटुंबिक संबंध नाहीत अशी लोक एकाच घरात एकत्र राहू शकत नाहीत. हा कायदा फक्त जोडप्यांनाच नाही तर मित्र, घरातील किंवा फ्लॅटमेट यांनाही लागू होतो. (Qatar Criminalizes Unmarried Physical Relation)


होमोसेक्सुअलिटी गुन्हा (What are Qatar’s homosexuality laws?)


कतारमध्ये 2 पुरूष किंवा 2 महिलांमध्ये असेलेली होमोसेक्सुअलिटी हा दंडनीय गुन्हा आहे. गुन्हा सिद्ध झाला तर Penal Code 2004 च्या अन्वये तब्बल 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची तरतूद कतारच्या कायद्यांमध्ये आहे.


जिना कायदा, दगडं फेकून मारण्याची शिक्षा -


फक्त कतारच नाही तर मिडल इस्ट देशांमध्ये जिना कायद्याद्वारे अविवाहित जोडप्यांना (Unmarried couples in Qatar) शारिरीक संबंध ठेवण्यास सक्त मनाई आहे. जिना कायदा हा इस्लामिक धर्माच्या आधारावर अनेक देशांनी लागू केलाय. The Humanitarian मध्ये यावर सविस्तर भाष्य देखील करण्यात आलंय. काही देशांमध्ये या गुन्हांना कठोर शिक्षा देण्यात येते काही अफ्रिकन देशांमध्ये दगड मारण्याची परंपरा देखील कायम आहे.


आणखी वाचा - FIFA World Cup 2022 : Cristiano Ronaldo ने रचला इतिहास; फुटबॉलप्रेमींना खडबडून जाग, पाहा Video


हाणामारी करणाऱ्यांवर 2 लाखाचा दंड -


फुटबॉलमध्ये अनेकदा प्रेक्षकांमध्ये भांडणं (brawl in the audience) पहायला मिळतात. फुटबॉल फॅन्स (football fans) जर कतारमध्ये (Qatar) भांडणं केली, हाणामारी केली किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर त्या व्यक्तीस 2 लाखाचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. तसेच तुरूंगात देखील रवानगी होण्याची शक्यता असते.