दुबई : दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर आणि फलंदाज क्विंटन डिकॉकने अखेर माफी मागितली आहे. दक्षिण आफ्रिका बोर्डाने सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना गुडघ्यावर बसणं बंधनकारक केलं होतं. आफ्रिकन मंडळाला वर्णभेदाविरुद्ध आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी असं बसणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र यावेळी डी डॉककने गुडघ्यावर बसण्यास नकार देत थेट सामन्यातून माघार घेतली होती. त्यानंतर डी-कॉकवर खूप टीका करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्विंटन डी कॉकने 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर'वरून टी-20 विश्वचषक सामन्यातून माघार घेतल्याबद्दल त्याच्या सहकारी आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. सध्याच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी उरलेल्या सामन्यांसाठी आपण गुडघे टेकण्यास तयार असल्याचे डी कॉकने निवेदनात म्हटलं आहे.


दरम्यान या सर्व प्रकरणावर वाद निर्माण झाल्यानंतर त्याने माघार घेत आपल्या सहकारी खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. तो म्हणाला की, गुडघ्यावर बसल्याने लोकांमध्ये जागरूकता पसरते आणि जर त्यांचं जीवन चांगलं झालं तर तो ते करण्यास आनंदाने तयार आहेत.


गुरुवारी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या ट्विटर हँडलवरून जारी केलेल्या वक्तव्यात डी कॉक म्हणाला, "जर मी इतरांना शिक्षित करण्यासाठी आणि इतरांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी माझे गुडघे टेकले तर मला असं करण्यात खूप आनंद होईल." CSA बोर्डाशी चर्चा केल्यानंतर, डी कॉकला वाटतं की त्याला आता 'त्यांच्या हेतूची चांगली समज आहे.'


डी कॉक पुढे म्हणाला, ''मला माझ्या संघ सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानायचे आहेत. विशेषत: आमचा कर्णधार टेम्बाचे (बावुमा). लोक त्याला ओळखत नसतील, पण तो एक अद्भुत नेता आहे. जर तो, संघ आणि दक्षिण आफ्रिका माझ्यासोबत असेल तर मला माझ्या देशासाठी पुन्हा क्रिकेट खेळायला आवडेल."