ENG vs AFG, World Cup 2023 : वर्ल्ड कप स्पर्धेला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा दारूण (Afghanistan Beat England ) पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप दिला आणि 284 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यांना फक्त 69 धावा करता आल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमान याने 3 विकेट घेतल्या. तर रहमानउल्ला गुरबाज याने 80 धावांची धमाकेदार खेळी केली. तर इंग्लंडकडून हॅरी ब्रुक याने सर्वाधिक 66 धावा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानने दिलेल्या 285 धावांचं आव्हान पार करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट लवकर बाद झाले. त्यानंतर सलामीवीर डेविड मलान आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडला सावरलं. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स आणि जॉस बटलर हे तगडे फलंदाज सपशेल फेल ठरले. अखेर आदिल रशिदने 20 धावा केल्या अन् इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.



प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी वर्ल्ड कपमधील 114 धावांची विक्रमी भागेदारी केली. त्यामुळे इंग्लंडला घाम फुटला होता. आदिल रशिदच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडने अफगाणिस्तानचा डाव गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र,  इक्रम अलीखिल याने एक बाजू आवळून धरली. त्याने 58 धावांची संयमी खेळी केली तर रशीद खान आणि मुजीब उर रहमान यांनी त्याला साथ देत अफगाणिस्तानची धावगती वाढवली. अखेर अफगाणिस्तानने 49.5 ओव्हरमध्ये 284 धावा केल्या. अफगाणिस्तानची टीम ऑलआऊट झाली होती.


आणखी वाचा - ENG vs AFG : नेमकी चूक कोणाची? सॅम करन की कॅमेरामॅन? Video पाहून तुम्हीच सांगा!


इंग्लंड : जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.


अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.