COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : हा व्हिडीओ देशातील पहिला टेस्ट क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ ब्रिटीश पाथचा आहे. 


या व्हिडीओ खूप काही पाहण्यासारखं आहे. काळाच्या ओघात फक्त क्रिकेटचं नाही, प्रेक्षक आणि स्टेडियम देखील बदलत गेलं. 


या व्हिडीओत प्रेक्षकांनी डोक्यावर उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून न्यूज पेपर्सच्या टोप्या बनवल्या आहेत. मागील बाजूस बसलेले प्रेक्षक कापडी मंडपात बसलेले आहेत.


भारतात झालेला हा पहिला ऑफिशियल क्रिकेट सामना होता, हा सामना १९५१ साली झाला असल्याचं ब्रिटीश पाथने म्हटलं आहे.


एक सामना इंडिया विरूद्ध एससीसी असं लिहिलेला बोर्डही या व्हिडीओत दिसतो. २ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान हा सामना असल्याचं लिहिलं आहे.


मात्र या व्हिडीओच्या आधी इंग्लंड टीमच्या खेळाडूंच्या नावाचा फलक झळकतोय. फिरोजशहा कोटला मैदानात सामना असल्याचा उल्लेख येथे करण्यात आला आहे.


तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद खेळाडूंना भेटत आहेत, त्यांच्यासोबत ग्रुपने फोटो काढत असल्याचं व्हिडीओत दिसतं.