पहिल्यांदा मैदानात भिडले नंतर ड्रेसिंग रुममध्ये तोडफोड
कोलंबोमध्ये सुरु असलेल्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत शुक्रवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सेमीफायनल रंगली. या सामन्यातील अखेरच्या षटकावरुन दोन्ही संघांमध्ये चांगलाच वाद रंगला.
मुंबई : कोलंबोमध्ये सुरु असलेल्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत शुक्रवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सेमीफायनल रंगली. या सामन्यातील अखेरच्या षटकावरुन दोन्ही संघांमध्ये चांगलाच वाद रंगला.
यावेळी मैदानावरील खेळाडूंना आवरण्यासाठी माजी खेळाडूंना यात लक्ष घालावे लागले. मैदानावर श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू एकमेकांसमोर भिडले. इतक्यावरच हे थांबल नाही तर बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममध्येही तोडफोड झाली. येथील काचा फोडण्यात आल्या.
क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या ड्रेसिंग रुममध्ये आतून तोडफोड करण्यात आली होती. बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बांगलादेशचे क्रिकेटर ड्रेसिंग रुमचे जिने ज्यावर काचा पसरल्यात त्यावरुन धावताना दिसतायत
मॅच रेफ्री किस ब्रॉड यांनी हे फुटेज पाहिले. रेफ्रीने कॅटरिंग स्टाफशी बातचीत केलीये. या घटनेत ज्यांचा समावेश आहे अशा खेळाडूंची नावे कॅटरिंग स्टाफने सांगितलीत. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.
ही घटना सामन्यातील अखेरच्या षटकांत सुरु झाली. या ओव्हरमधील दोनही बॉल नोबॉल होते असे बांगलादेशच्या क्रिकेटर्सचे म्हणणे होते मात्र अंपायरने त्याला नकार दिला. यामुळे संतापलेल्या शाकीब अल हसनने संघाला माघारी बोलावले. ५ मिनिटे हा ड्रामा सुरु होता. अखेर माजी क्रिकेटर खलिम मेहमूद यांनी मध्यस्थी घेतली. अखेर शाकिबला समजावल्यानंतर त्याने बॅटसमनना खेळण्यास मैदानात पाठवले. जर बांगलादेशच्या क्रिकेटर्सनी बॅटिंग केली नसती तर श्रीलंकेचा संघ जिंकला असता.