ICC World Cup 2023 Full Schedule | सुट्ट्या टाकाच...वर्ल्ड कपमध्ये रंगणार 5 थरारक सामने; पाहा वेळापत्रक
Five key matches icc world cup 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. या वर्ल्ड कपमध्ये पाच रंगतदार सामने रंगणार आहे.
ICC ODI World Cup 2023: आगामी वनडे वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा (icc world cup 2023 full schedule announcement) करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 5 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. तर याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. या वर्ल्ड कपमध्ये पाच रंगतदार सामने रंगणार आहे. या दिवशी तुम्हीही सुट्टी घेऊन सामना पहायला हवा. कोणते निर्णायक सामने असतील, पाहा...
India v Pakistan (अहमदाबाद) 15 ऑक्टोबर
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणारा 15 ऑक्टोबरचा सामना दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेचा असणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर हा सामना खेळवला जाईल. वर्ल्ड कपमधील सर्वात फेवरेट असा हा सामना असणार आहे.
England v New Zealand (अहमदाबाद) 5 ऑक्टोबर
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाणारा सामना खऱ्या अर्थाने हायप्रोफाईल सामना असणार आहे. दोन्ही संघात कडवी टक्कर होण्याची शक्यता असल्याने हा सामना महत्त्वाचा ठरेल.
India v Australia (चेन्नई) 8 ऑक्टोबर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत.
Australia v South Africa (लखनऊ) 13 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिका यांच्यात 13 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणारा सामना गेम चेंजर ठरू शकतो. दोन्ही देशांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.
Bangladesh v Afghanistan (धर्मशाला) 7 ऑक्टोबर
बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात दोन पाईंट्ससाठी होणारा सामना निर्णायक ठरू शकतो. 7 ऑक्टोबर रोजी धर्माशाला येथे हा सामना खेळवला जाणार आहे.
आणखी वाचा - भारत-पाकिस्तान World Cup सामन्याच्या तारखेची घोषणा! भारतातील 'या' शहरात रंगणार सामना
दरम्यान, नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, धर्मशाला बेंगलोर, हैदराबाद, पुणे व लखनऊ येथे विश्वचषकातील सामने खेळले जातील. तर मोहली व गुवाहाटी येथे काही सराव सामने होणार आहेत. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.