Mumbai Indians: शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा यंदाच्या सिझनमधील हा आठवा पराभव होता. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सवर चिटींगचा आरोप करण्यात येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चिटींगचा आरोप पुन्हा एकदा टॉसच्या मुद्द्यावरून झाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील पंड्यावर असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय. यावेळी केवळ मुंबई इंडियन्सच नाही तर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याही मैदानाच चिटींग करतो असा आरोप करण्यात येतोय.


टॉस जिंकण्यासाठी हार्दिकने केली चिटींग?


शुक्रवारी झालेल्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर टॉससाठी मैदानावर उपस्थित होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने टॉससाठी नाणं उडवलं. त्यावेळी नाणं खाली पडल्यानंतर त्याचा निकाल कॅमेरात दाखवण्यापूर्वी रेफरींनी मुंबईला विजयी घोषित केलं. दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला चिटर म्हणत ट्रोल केलं जातंय. ( या चिटींगबाबत सोशल मीडियावर दावे केले जात असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही )



यापूर्वीही हार्दिकवर झालेला असा आरोप


यापूर्वी आरसीबी विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील टॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या डोक्यावरून मागील बाजूने नाणं फेकताना दिसत होता. यावेळी टॉससाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या मागील बाजूस हे नाणं पडताना दिसतं. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ हे नाणं उचलण्यासाठी माघारी फिरतात. ज्यावेळी आरसीबीच्या चाहत्यांनी बीसीसीआयच्या मॅच रेफ्रीवर नाणे उलटं उचलल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा हार्दिक पंड्यावर अशा पद्धतीचा आरोप करण्यात येतोय. 


कोलकात्याकडून मुंबई इंडियन्सचा पराभव


आयपीएलच्या 51 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 रन्सने पराभव केला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला विजयासाठी 170 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. ज्याचा पाठलाग करताना मुंबईची संपूर्ण टीम 18.5 ओव्हर्समध्ये अवघ्या 145 रन्समध्ये गारद झाली. त्यामुळे कोलकाताने 12 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर हरवण्यात यश मिळवलं आहे. 2012 मध्ये कोलकाताने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईने वानखेडेवर निर्विवाद सत्ता गाजवली.