Pele Demise : महान फुटबॉलर पेले यांचे मध्यरात्री निधन झाल्याची दु:खद घटना घडलीय. पेले (Pele) हे कॅन्सर (colon cancer) या आजाराशी झूंज देत होते. मात्र त्यांची ही झूंज अपयशी ठरली होती. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोक व्यक्त होत आहे. पेले हे फुटबॉलच्या मैदानावरील जादूगार होते. त्यांनी त्याच्या आयुष्यात खुप संघर्ष केला होता. त्याच्या आयुष्यात एक काळ असा  होता की, ते फुटबॉल देखील खेरदी करू शकत नव्हते, मात्र आता ते कोट्यावधीच्या संपत्तीचे मालक होते. त्यामुळे नेमके ते किती कोटींची संपत्ती मागे सोडून गेले आहेत, हे जाणून घेऊयात. 


संघर्षमय आयुष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेले (Pele Demise) यांचे सुरुवातीचे आयुष्य खुप संघर्षमय होते. त्यांचा जन्म गरीब कुटूंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना फुटबॉलची आवड होती. त्यावेळेस त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की, त्याच्याकडे फुटबॉल आणि किट विकत घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. पेले साओ पाउलोच्या रस्त्यावर वर्तमानपत्राच्या कचऱ्याचा गोळा बनवून फुटबॉल खेळायचे. त्यांनी चहाच्या दुकानात वेटर म्हणूनही काम केले होते. खुप संघर्षमय प्रवास करून त्यांनी फुटबॉल जगतात नाव कमावले होते. 


फुटबॉलने दिली टोपणनावे


पेले (Pele Demise) यांचे पूर्ण नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो होते. मात्र, पेले फुटबॉल क्षेत्रात नवनवीन विक्रम करत राहिल्याने त्यांना 'ब्लॅक पर्ल', 'किंग ऑफ फुटबॉल','किंग पेले' अशी अनेक टोपणनावे मिळाली होती. 


किती संपत्ती होती ? 


'फुटबॉलचे किंग'' म्हणून ओळखले जाणारे पेले यांनी जवळपास $100 दशलक्ष संपत्ती मागे ठेवली आहे. त्यांना आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू मानले जाते.तसेच ते जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू होते, अशी माहिती द सन कॉमने दिली आहे. 


ब्रॅड्समधून करायचे कमाई 


फुटबॉलसह ते अनेक प्रसिद्ध ब्रँड्समधून देखील कमाई करायचे. पेले यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे $14 दशलक्ष होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध ब्रँड एंडोर्समेंटद्वारे भरपूर संपत्ती कमावली. ते पुमासारख्या शू ब्रँडसोबतही होते. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्यांनी भरपूर संपत्ती कमावली. 1992 मध्ये त्यांची इकोलॉजी आणि पर्यावरणासाठी संयुक्त राष्ट्रांचे राजदूत म्हणून नामांकन करण्यात आले, तर 1994 मध्ये युनेस्कोचे सद्भावना दूत म्हणून नामांकन करण्यात आले होते, अशी माहिती द डेली स्टारने दिली आहे. 


तीनदा वर्ल्ड कपवर जिंकून दिला


पेले (Pele) यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत. ब्राझीलसाठी त्यांनी 91 सामने खेळले असून एकूण 77 गोल केले आहेत.


दरम्यान नुकत्याच फीफा वर्ल्डकप 2022 (Fifa World Cup 2022) वर नाव कोरलेल्या अर्जेंटिना संघाचे त्यांनी अभिनंदन केलं होतं. तसेच लियोनेल मेस्सी विजयाचा खरा हिरो असल्याचं त्यांनी सांगितले होते.