अंबाती रायडूचा राजकारणात प्रवेश; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अंबाती रायडूने राजकारणात प्रवेश केला आहे. अंबाती रायडून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीत (YSRCP) प्रवेश केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अंबाती रायडूने राजकारणात प्रवेश केला आहे. अंबाती रायडून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीत (VYSRCP) प्रवेश केला आहे. विजयवाडा येथील मुख्यमंत्री कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी यांच्यासह जगन मोहन रेड्डी यांनी अंबाती रायडूचे पक्षात स्वागत केले. पक्षाने एक्स अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना वायसीआर पक्षाने लिहिलं आहे की, "प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू अंबाती तिरुपती रायडूने मुख्यमंत्री श्री वायएस जगन यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कॅम्प ऑफिसमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेड्डीरेड्डी मिथुन रेड्डी यांनी या कार्यक्रमात भाग घेतला".
अंबाती रायडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश आणि हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये संघात संधी नाकारल्यानंतर अंबाती रायडूने नाराज होत निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही महिन्यातच अंबाती रायडूने राजकारणात प्रवेश करत आपल्या सेकंड इनिंगची सुरुवात केली आहे.
"लोकांच्या सेवेसाठी मी लवकरच आंध्रप्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देऊन लोकांना समजून घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं ठरवलं आहे," असं त्याने मुतलुरू येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.
अंबाती रायडू आंध्र प्रदेशातील गुंटूर किंवा मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. रायुडूने मात्र हे दावे फेटाळून लावले आहेत.
28 मे 2023 रोजी निवृत्तीची घोषणा
चेन्नईकडू खेळणाऱ्या अंबाती रायडूने आयपीएल 2023 मध्ये अंतिम सामन्याआधी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. गुजरात विरुद्धचा सामना हा माझ्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असेल, असं रायुडूने म्हटलंय.
”2 दिग्गज टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स. 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आज रात्री सहावी ट्रॉफी जिंकू. हा फार खूप मोठा प्रवास आहे. आयपीएलमधील आजचा सामना हा माझा अंतिम सामना असेल. ही महान स्पर्धा खेळताना मला खरोखर आनंद झालाय. तुम्हा सर्वांचे आभार. नो यू टर्न”, असं अंबातीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.