मुंबई : देशात दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. अनेक क्रिकेटर्स देखील या विळख्यात सापडले आहेत. नुकतंच भारताचा माजी स्पिनर हरभजन सिंगला कोरोना झाल्याची माहिती आहे. हरभजनने स्वतः याची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सकाळी हरभजन सिंगने ट्विटरवर त्याला कोरोना झालं असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो सध्या त्याच्या घरी क्वारंटाईनमध्ये आहे.



हरभजन सिंगने ट्विट करून माहिती दिली की, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी माझ्या घरीच स्वतःला क्वारंटाइन केलं असून सर्व खबरदारी घेतोय."


जी कोणी व्यक्ती माझ्या संपर्कात आली असेल, त्यांनी ताबडतोब कोरोना चाचणी घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहनंही हरभजनने केलं आहे.


हरभजन सिंगने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो चर्चेत राहिला होता. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत हरभजन सिंग राजकारणात येऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती.