IPL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात, झारखंड निवडणुकीत मोठी जबाबदारी
Jharkhand Elections 2024 : धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. यंदा आयपीएल 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्रिकेटरला खेळताना पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत.
MS Dhoni Jharkhand Elections 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असून त्याच्या नेतृत्वात भारताने आयसीसीची तीन विजेतेपदं जिंकली आहेत. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. यंदा आयपीएल 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्रिकेटरला खेळताना पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत. धोनी हा मूळ रांची येथील झारखंडचा असून येथे विधानसभेच्या निवडणुका (Jharkhand Assembly Election 2024) पार पडणार आहेत. तेव्हा धोनी यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून त्याच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.
धोनीला मिळाली मोठी जबाबदारी :
झारखंड विधानसभा निवडणुक 2024 च्या पाश्ववभूमीवर माजी कर्णधार एम एस धोनीकडे निवडणूक आयोगाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी धोनीची राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत धोनी निवडणूक आयोगाच्या स्वीप या जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग असेल. धोनीही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसणार आहे. झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी झारखंड विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग असेल. याबाबतचे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. निवडणूक आयोग स्वीपच्या जनजागृती कार्यक्रमात धोनीचे छायाचित्र वापरणार आहे.
हेही वाचा : 23 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियावर लागला डाग
के. रवी कुमार म्हणाले की, 'मतदारांना जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे धोनीने केलेले आवाहन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उपयोगात येईल. धोनी मुख्य निवडणूक अधिकारी, झारखंडच्या कार्यालयाशी जोडला जाईल आणि मतदार जागृती मोहिमेत सहकार्य करेल. नामवंत व्यक्तीच्या सहभागामुळे मतदार जागृती मोहिमेला बळ मिळेल. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी 43 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी 38 जागांवर मतदान होईल. यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.