दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्थिवच्या वडिलांचं निधन झालं आहे. स्वतः पार्थिव पटेलने ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिलीये. यानंतर अनेकांनी श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्थिवचे वडील अजयभाई बिपीनचंद्र पटेल यांचे रविवारी निधन झालं. पार्थिव पटेलने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. पार्थिव पटेलच्या वडिलांना ब्रेन हॅमरेजनंतर अहमदाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


पार्थिव त्याच्या ट्वीटमध्ये म्हणतो "अत्यंत दुखी मनाने मी माझे वडील अजयभाई बिपीनचंद्र पटेल यांच्या निधनाबद्दल कळवतो. 26 सप्टेंबर रोजी ते त्यांच्या शेवटच्या प्रवासाला निघाले. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची मी विनंती करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो."


यापूर्वी पार्थिव पटेलने ट्विट केलं होतं की, "त्याचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे ग्रस्त आहेत. कृपया वडिलांसाठी प्रार्थना करा." 



भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती. २०१८ मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता. पार्थिव पटेल याने २००२ मध्ये इंग्लंड दौर्‍यावर वयाच्या १७ व्या वर्षी टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावर्षी आयपीएलमध्ये पार्थिव पटेल आरसीबीचा भाग होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती.