Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीच्या या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष, आधी तिरंगा हातात घेतला अन् नंतर...
Shahid Afridi Indian Flag: कतारमध्ये सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मास्टर्स खेळलं जात आहे. यादरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत शाहिद आफ्रिदीच्या हातात तिरंगा (Indian Flag) दिसत आहे.
Shahid Afridi Indian Flag: लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मास्टर्सच्या निमित्ताने अनेक दिग्गज खेळाडू सध्या कतारमध्ये आहेत. भारतासह पाकिस्तानचाही संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. यादरम्यान एशिया लायन्सने (Asia Lions) इंडिया महाराजाचा (India Maharajas) एलिमिनेटर सामन्यात पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एशिया लायन्सने 85 धावांनी इंडिया महाराजाचा पराभव केला. एशिया लायन्सचं नेतृत्व पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) करत आहे. एकीकडे या स्पर्धेची चर्चा सुरु असताना दुसरीकडे शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहिद आफ्रिदी भारताच्या ध्वजासोबत दिसत आहे. यावेळी त्याने असं काही केलं की, संपूर्ण क्रिडा विश्व आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शाहिद आफ्रिदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसत आहे, त्यानुसार एक भारतीय चाहता शाहिद आफ्रिदीकडे ऑटोग्राफ मागत आहे. विमातळावरील हा कर्मचारी शाहिद आफ्रिदीकडे तिरंगा (Tiranga) सोपवतो. यानंतर शाहिद आफ्रिदीही त्याला आपलेपणाने त्यावर सही करत परत देताना दिसत आहे.
भारत आणि पाकिस्तान पारंपारिक स्पर्धक असून दोन्ही देशांमधील वैरही सर्वज्ञात आहे. अशामध्ये शाहिद आफ्रिदीने द्वेषाच्या भिंती ओलांडत तिरंग्यावर (Indian Flag) स्वाक्षरी करत असल्याने चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एशिया लायन्सने 20 ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावत 191 धावा केल्या होत्या. दरम्यान, गोलंदाजी करताना एशिया लायन्सने इंडिया महाराजाला 16.4 ओव्हरमध्येच ऑल आऊट केलं. इंडिया महाराजाच्या वतीने कर्णधार गौतम गंभीरने 32 धावा केल्या. पण गंभीर वगळता कोणीही जास्त धावा करु शकलं नाही. आता एशिया लायन्स अंतिम सामन्यात वर्ल्ड जायंटशी भिडणार आहे.