माजी क्रिकेटर जडेजाचं निधन, कोरोनाने घेतला जीव.. क्रिकेट जगतात शोक
क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत दुःखद बातमी
मुंबई : भारतीय संघाने आपल्या माजी खेळाडूला गमावलं आहे. भारतीय संघातील माजी खेळाडू अंबाप्रतासिंहजी जडेजा यांचं मंगळवारी कोविड-19 मुळे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट संघाने याची माहिती दिली आहे.
माजी क्रिकेटर जडेजा यांचं निधन
सौराष्ट्र क्रिकेट संघातील प्रत्येक जण ज्येष्ठ माजी खेळाडू अंबाप्रतापसिंहजी जडेजा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे, अशी माहिती सौराष्ट्र क्रिकेट संघाने दिली आहे. कोरोनाशी झुंज देत असताना वलसाड येथे त्यांचं निधन झालं.
जामनगरमध्ये राहणारे अंबाप्रतापसिंह जडेजा जलद गोलंदाज आणि उत्कृष्ठ फलंदाज होते. त्यांनी सौराष्ट्र संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये आठ सामने खेळले आहेत.
गुजरात पोलीसातून सेवानिवृत्त DSP होते. जडेजा यांनी आठ रणजी सामन्यात 11.11 च्या रन रेटने 100 धावा केल्या होत्या. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर 17 च्या सरासरीनुसार 10 विकेट घेतले.
कोरोनामुळे निधन
भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) माजी सचिव निरंजन शाह यांनी सांगितल्याप्रमाणे 'अंबप्रतापसिंह एक उत्तम खेळाडू होते. अनेकदा मी त्यांच्याशी क्रिकेट संदर्भात बोललो आहे. ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो.'
गेल्यावर्षी या खेळाडूने गमावला जीव
गेल्या वर्षीही अनेक आजी आणि माजी क्रिकेटपटूंचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामध्ये राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा ३६ वर्षीय लेगस्पिनर विवेक यादवचा सहभाग होता.
5 मे 2021 रोजी विवेकचा जयपूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. विवेक 2010-11 आणि 2011-12 हंगामात रणजी करंडक जिंकणाऱ्या राजस्थान संघाचा सदस्य होता. त्याने 2008 ते 2013 दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 57 बळी घेतले. जामनगरचा रहिवासी असलेले जडेजे हे मध्यम वेगवान गोलंदाज आणि उत्तम फलंदाज होते.