नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून आता अशी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान विरोधात हॅटट्रीक घेणारा दक्षिण अफ्रीकाचा माजी बॉलर डायन तलजार्ड याला बलात्कार प्रकरणी शिक्षा झाली आहे. डायन तलजार्ड याने एका महिलेवर १९ वेळा बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. यानंतर डायन तलजार्ड यांना १८ वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.


डायन तलजार्ड याला एका महिलेवर १९ वेळा बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. पीडित महिलेचा आरोप होता की, डायने २००२ ते २०१२ पर्यंत १५०हून अधिक वेळा बलात्कार केला. तसेच त्याने मला धमक्याही दिल्या.


पीडित महिलेने या सर्व प्रकरणाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २०१५ मध्ये पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. तर, तीन मुलांचा पिता डायन तलजार्डने आपला बचाव करताना म्हटलं की, मला या प्रकरणात अडकवलं आहे.


न्यायालयात डायन तलजार्ड याला न्यायाधिशांनी म्हटले की, तु पीडित महिलेसोबत अनेकदा हिंसा केली आहे. बलात्कार केला, त्यानंतर तिला अनेक गलिच्छ मेसेजेस पाठवले. पीडित महिला तुला घाबरते. तिच्या अनेक समस्या आहेत.