FIFA World Cup 2022 : Morocco ला धूळ चारत फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, आता मेस्सीचं आव्हान
France vs Morocco FIFA World Cup Semi final Highlights : साधारण महिन्याभरापासून सुरु झालेला फुटबॉल वर्ल्ड कप आता अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
France vs Morocco FIFA World Cup Semi final Highlights : साधारण महिन्याभरापासून सुरु झालेला फुटबॉल वर्ल्ड कप आता अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य सामन्यातून अर्जेंटिनानं Final चं तिकीट मिळवल्यानंतर आता, दुसरा उपांत्य सामनासुद्धा तितकाच रंजक ठरला. फिफा वर्ल्ड कपमधील गतविजेत्या फ्रान्सच्या संघानं सलग दुसऱ्या वेळेस या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. कतारमध्ये खेळल्या गेलेल्या या उपांत्य सामन्यामध्ये फ्रान्सनं मोरक्कोचा 2-0 असा पराभव केला आणि थेट मेस्सीच्या अर्जेंटिनालाच आव्हान दिलं. या पराभवामुळं पहिल्या आफ्रिकन संघाला फिफाच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्याचं मोरक्को संघाचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं.
हेसुद्धा वाचा : FIFA World Cup 2022 : मेस्सीनं चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; अर्जेंटिना अंतिम सामन्यात जाताच हे काय ऐकायला मिळतंय?
अंतिम सामन्यात पोहोचल्यामुळे आता फ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांना अंतिम सामना खेळण्यासाठी आणि तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष फिफाच्या अंतिम सामन्यावर लागून राहिलं आहे. 18 डिसेंबरला हा हाय व्होलटेज सामना कतारमध्ये खेळवला जाणार आहे. France vs Morocco सामन्याविषयी सांगावं तर, यामध्ये 5 व्या मिनिटाला फ्रान्सचा डिफेंडर थियो हर्नांडेज यानं संघासाठी पहिला गोल केला. तर, 79 व्या मिनिटाला रँडल कोलो मुआनी यानं दुसरा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
फ्रान्सची आतापर्यंतची कामगिरी...
फिफाच्या इतिहासात फ्रान्सच्या संघानं आतापर्यंत चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. यापूर्वी फ्रान्सचा संघ 1998 आणि 2018 मध्ये जगज्जेता ठरला होता. तर, 2006 मध्ये संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा विजेता होऊन देशाला खास भेट देण्यासाठीच फ्रान्सचे खेळाडू प्रयत्नशील असतील.
मोरक्कोचा संघ थोडक्यात चुकला
मोरक्कोचा संघ यावेळी फिफामध्ये विक्रम कामगिरी करताना दिसला. पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठत या संघानं उल्लेखनीय कामगिरी केली. Semi Finals मध्ये पोहोचणारा हा पहिला आफ्रिकन संघ ठरला. जर या संघानं अंतिम सामन्यात धडक मारली असती, तर आतापर्यंतच्या फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिकन संघानं तिथपर्यंत मजल मारल्याचं पाहायला मिळालं असतं. पण, दुर्दैवानं मोरक्कोचं हे स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं.