मुंबई : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली रोमानियाची सिमॉन हॅलेप आणि अमेरिकेची स्लोन स्टिफन्स यांच्यामध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. सिमॉननं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील अंतिम फेरीत तिसऱ्यांदा धडक मारली आहे. तर सिमॉननं उपांत्य फेरीत गार्बिन मुगुरुजाला ६-१, ६-४नं पराभूत करत अंतिम फेरी गाठली.


तर स्टिफन्स गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेचं विजेतपद पटकावलं होतं. स्टिफननं उपांत्य फेरीत आपल्या देशाच्या मेडिसन कीजला ६-४, ६-४नं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता सेरेना आणि शारापोव्हाच्या गैरहजेरीत फ्रेंच ओपनचं विजेतेपद कोण पटकावतं याकडेच साऱ्या टेनिस विश्वाचं लक्ष लागून राहिल आहे.