World Cup: स्टम्पपासून ते `स्पायडर कॅम`पर्यंत..., मैदानात नेमके किती कॅमेरा असतात?
World Cup: तुम्ही टीव्हीवर सामना पाहत असताना, तुम्ही अनेक कॅमरा अँगलमधून त्याचा आनंद घेऊ शकता. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की, एका सामन्यात किती कॅमेरे वापरले जातात?
World Cup: आज वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. सर्व चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता आहे. दुपारी 2 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामधील एक टेक्नॉलॉजी म्हणजे कॅमेरांची.
तुम्ही टीव्हीवर सामना पाहत असताना, तुम्ही अनेक कॅमरा अँगलमधून त्याचा आनंद घेऊ शकता. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की, एका सामन्यात किती कॅमेरे वापरले जातात? आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अनेक प्रकारचे कॅमेरे वापरले जातात.
जाणून घेऊया सामन्यात किती आणि कोणत्या कॅमेरांचा वापर केला जातो.
ऑऊटसाइड ब्रॉडकास्टिंग स्टूडियोसाठी 1 कैमरा
फिल्ड प्लेला कव्हर करण्यासाठी 12 कॅमरे
6-हॉकआई कॅमरे
रन-आउट व्हिडीओ कॅप्टर करण्यासाठी 4 कॅमरे
स्ट्राईक झोन कॅप्चर करण्यासाठी 2 कॅमरे
4-स्टंप कॅमरे
1-प्रेझेंटेशन कॅमरा
प्रत्येक सामन्यात वापरल्या जाणाऱ्या कॅमेरांचं काम वेगळं असून त्यासाठी अनेक प्रकारचे कॅमेरे वापरले जातात.
कोणता कॅमेरा कसं काम करतो?
मेन कॅमरा
हे प्राथमिक कॅमेरे असून स्टेडियममध्ये नियोजित पद्धतीने बसवले आहेत. हे कॅमेरे अशा प्रकारे सेट केले आहेत की, ते वाईड अँगल शॉट्स कॅप्चर करू शकतात.
बाउंड्री कॅमरा
हा कॅमेरा फार महत्त्वाचा असून बाऊंड्री लाईनजवळ हे कॅमेरे तुम्ही अनेकदा पाहिले असतील. हे फिल्डरच्या क्लोज-अप शॉट्ससाठी वापरले जातात.
स्टंप कॅमरा
हे स्टंपच्या मध्यभागी लावलेले असतात. हे गोलंदाज, फलंदाज आणि विकेटकीपरशी संबंधित विशेष माहिती देतात. या मदतीने स्टंपजवळ स्लो मोशन रिप्ले पाहू शकतो.
स्पायडर कॅमरा
हा कॅमेरा उभ्या आणि आडव्या दोन्ही दिशेने फिरू शकतो. या कॅमेऱ्यांमधून डायनॅमिक एरियल शॉट्स उपलब्ध आहेत.
अल्ट्रा स्लो-मोशन कॅमरा
हाय स्पीड कॅमेरा त्वरीत हालचाली कॅप्चर करतात. त्यांच्या मदतीने, स्लो मोशन रिप्ले उपलब्ध होऊ शकतात.
हेल्मेट कॅमरा
अनेकदा खेळाडूंच्या हेल्मेटमध्ये कॅमेरे वापरले जातात. जे गेमचा फर्स्ट पर्सन व्यू दाखवतात. या कॅमेऱ्याच्या मदतीने बॉल बॅटरकडे कसा येतो याची कल्पना येते.
रोबोटिक कॅमरा
विविध ठिकाणी रिमोट कंट्रोल कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे गेमची फ्लेक्सिबिलिटी आणि एडज्स्टेबल अँगल दाखवतात.