Lucknow Super Giants : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात (Australia vs West Indies) झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एका कॅरेबियन खेळाडूने कांगारूंना पाणी पाजलं होतं. तब्बल 27 वर्षानंतर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट विजय मिळवता आला तो एका युवा गोलंदाजामुळे.. होय हा दुसरा तिसरा कोणी नसून  24 वर्षांचा शमर जोसेफ आहे. शमर जोसेफ (Shamar Joseph) याने दणक्यात विजय मिळवून देत गाबाचा घमंड मोडला होता. अशातच आता शमर जोसेफ याची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. लखनऊ सुपर जायएन्ट्सने (LSG) शमर जोसेफला करारबद्द्ध केल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अतिशय चांगली कामगिरी करणारा हा युवा वेगवान गोलंदाज आता लखनऊ सुपर जायंट्समध्ये मार्क वुडची (Mark Wood) जागा घेणार आहे. मार्क वूड यंदाच्या हंगामात संघात नसेल, अशी माहिती समोर आली होती. अशातच आता लखनऊने यावर शिक्कामोर्तब केलं असून वेस्ट इंडिजच्या नव्या खेळाडूला ताफ्यात सामील करून घेतलंय. 3 कोटींच्या किमतीत (Shamar Joseph Prize Money) त्याला संघात घेण्यात आल्याची माहिती आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरून देण्यात आलीये.



कोण आहे शमर जोसेफ ?


शमरला क्रिकेटची लहानपणापासून आवड होती. पण घरात आठराविश्व दारिद्रय... शमर जोसेफ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1999 रोजी गयानामधील बाराकारा या छोट्या गावात झाला. जोसेफला तीन बहिणी आणि पाच भाऊ... क्रिकेट पाहण्यात आणि क्रिकेट खेळण्यात त्याचं बालपण गेलं. गरिबीमुळे त्याला नोकरी करावी लागली. जोसेफला कर्टली ॲम्ब्रोसद्वारे चालवलेल्या वेगवान गोलंदाजी क्लिनिकमध्ये जाण्याची संधी देखील मिळाली. जोसेफ फेब्रुवारी 2023 मध्ये वेस्ट इंडीज चॅम्पियनशिप सामन्यात गयानासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केलं.


दरम्यान, शामर जोसेफने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. गाभा येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक 7 बळी घेतले होते. 


लखनऊ सुपर जायंट्स : अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, के. गौथम, केएल राहुल, क्रुणाल पांड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, शमर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक.


नवे खेळाडू : शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.