लंडन : वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे पुढील तीन आठवड्यांसाठी मुकावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गब्बर शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०९ बॉलमध्ये ११७ रनची दमदार शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान शिखरच्या डावा अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर नॅथन कूल्टर नाईलच्या बॉलिंगवर धवनला ही दुखापत झाली. नॉटिंगघममध्ये करण्यात आलेल्या उपचारदरम्यान त्याचा बोट फ्रॅक्चर असल्याचे पुढे आले.


यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मॅचमध्ये धवन फिल्डींग करण्यासाठी देखील मैदानात उतरला नाही. त्याऐवजी रविंद्र जडेजा मैदानात फिल्डिंग करण्यासाठी आला होता. 


शिखरच्या जागी कोण?


शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे त्याला न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या मॅचेसला मुकावे लागणार आहे. त्यामुळे शिखर धवनच्या जागेवर केएल राहुल सलामीला खेळायला येऊ शकतो.


धवनची आयसीसी स्पर्धांमधील कामगिरी


शिखर धवनने आयसीसीच्या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. शिखरने २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ५१.५० च्या सरासरीने ४१२ रन केल्या. ज्यात २ शतकांचा समावेश होता. तर २०१३-२०१७ चॅम्पिअन ट्रॉफीमध्ये शिखर धवनने धमाल कामगिरी केली होती. यात त्याने ७७ च्या सरासरीने  ७०१ रन केले होते. तीन शतकांचा समावेश होता.