Asia Cup 2023: पाकिस्तानचा खेळ खल्लास! IND vs PAK सामन्यासाठी सनी देओलची एन्ट्री; पाहा Video
IND vs PAK, Asia Cup 2023: गदर-2 सिनेमामुळे भारतीयांच्या मनात उत्साह संचारला आहे. अशातच आता सनी देओलची (Sunny Deol) भारत पाकिस्तान सामन्यासाठी एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे.
India vs Pakistan Video: तब्बल 1 वर्षानंतर आता भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने सामने येणार आहे. त्याला निमित्त ठरलंय, आशिया कप. येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेला सुरूवात होत आहे. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी सर्वांना आतुरता असलेला महामुकाबला म्हणजे भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाईल. श्रीलंकेमध्ये हा सामना खेळवला जाणार असल्याने आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, सामना सुरू होण्याआधीच क्रिडाप्रेमींच्या अंगात जोश संचारला आहे. त्याला कारण ठरतंय, सनी देओलचा गदर-2 सिनेमा. गदर-2 सिनेमामुळे भारतीयांच्या मनात उत्साह संचारला आहे. अशातच आता सनी देओलची (Sunny Deol) भारत पाकिस्तान सामन्यासाठी एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे.
भारत पाकिस्तान सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सने (Star Sports) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सनी देओल क्रिकेट चाहत्यांना आवाहन करताना दिसतोय. आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मी सनी देओल असतो, पण ही चुरशीची स्पर्धा सुरू होताच मी तारा सिंग होईन, असं सनी देओल म्हणतो. या सामन्यात गदर करायचा असेल तर या, टीम इंडियासाठी हात वर करा आणि मेन इन ब्लूचा जोश वाढवा, असं आवाहन देखील सनी देओलने केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा video
गदर-2 या चित्रपटातून चर्चेत आलेला सनी देओल आशिया कपच्या स्टार स्पोर्ट्स या ब्रॉडकास्टरवर दिसणार आहे. त्यामुळे आता हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा आता क्रिकेटच्या मैदानावर देताना तो दिसणार यात काही शंका नाही.
आणखी वाचा - Ghoomer : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह आणि 'घूमर' सिनेमाचं कनेक्शन माहिती का?
दरम्यान, भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे. भारत अ गटात आहे. पाकिस्तान आणि नेपाळही त्याच्यासोबत आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.