Zee Sting Operation: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) चे मुख्य सिलेक्टर (Chetan Sharma) यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर मोठे खुलासे झाले. यानंतर आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI आता एक्शन घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन शर्मा यांची आता खुर्ची जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Zee मिडीयाच्या स्टिंगमध्ये सिलेक्शन संदर्भातील बाबी, कोहली-गांगुली वाद, खेळाडूंचा फिटनेस यासोबत अनेक बाबींवर खुलासे झाले. दरम्यान या स्टिंगमुळे चेतन शर्मा चांगल्याच वादात सापडले आहेत. 


BCCI लवकरच करणार अधिकृत विधान जाहीर


Zee मिडीयाच्या स्टिंग ऑपरेशनबाबत बोलण्यास बीसीसीआयचे अधिकारी पुढे येताना दिसत नाहीयेत. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याशी जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते इतकंच म्हणाले की, BCCI लवकरच अधिकृत निर्णय घेणार आहे. याविषयी अजून काही बोलण्यास आशिष शेलार यांनी नकार दिला. 


स्टिंग ऑपरेशमनमुळे मोठी खळबळ


चेतन शर्मा (Chetan Sharma)  यांनी भारतीय संघात इंजेक्शन खेळ सुरू असल्याचं म्हटलं आहे. इंजेक्शनच्या मदतीने टीम इंडियाचे अनफिट खेळाडू देखील फिट होत आहेत, असा खळबळजनक खुलासा चेतन शर्मा यांनी केलाय. त्यावेळी त्यांनी गांगुली विराट वाद (Ganguly Virat controversy) त्याचबरोबर बुमराहच्या फिटनेसविषय़ी (Bumrah's fitness) देखील भाष्य केलंय. त्याचबरोबर रोहितच्या  T-20 कॅप्टन्सीबाबत चेतन शर्मा यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट देखील केलाय.


काय म्हणाले चेतन शर्मा?


रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी-20 मधून पत्ता कट करण्यात येईल, असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं आहे. टी-ट्वेंटीमध्ये शुभमन आणि इतर खेळाडूंना संधी मिळावी, म्हणून रोहित विराटला विश्रांती दिली जात आहे. हार्दिक हा दिर्घकाळ टीम इंडियाची धुरा सांभाळेल. त्यामुळे रोहित यापुढे टी-20 संघात दिसणार नाही, असं चेतन शर्मा म्हणाले आहेत.