मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघातील फलंदाज ऋषभ पंतची उत्कृष्ट भूमिका पाहायला मिळाली होती. ज्यामध्ये अंतिम सामन्यात ऋषभ पंतने 101 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतच्या या कामगिरीमुळे भारताने शानदार विजय मिळावला. या प्रदर्शनामुळे ऋषभ पंतला मॅन ऑफ द मॅच घोषित केले गेले. सीरीजमध्ये त्याने शानदार कामगिरी केली. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने ऋषभ पंतला शुभेच्छा देत मॅच विनर म्हटले आहे. तर ऋषभ पंतची तुलना विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि महेंद्र सिंग धोनी सोबत केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपाहिनी सोबत बोलताना सौरव गांगुलीने म्हटले की, मी ऋषभ पंतला खूप जवळून पाहिले आहे. मी मॅच विनरवर जास्त विश्वास ठेवतो. यापैकी एक ऋषभ पंत आहे. तसेच या अगोदर मी म्हटले होते की, जर ते 5-6 ओव्हर राहीले असते तर भारताने सिडनी टेस्ट मध्येही विजय मिळवला असता. तो एक गेम चेंजर खेळाडू आहे. मला मॅच विनर खेळाडू अवडतात. माझ्या वेळेस सेहवाग, युवराज आणि धोनी गेम चेंजर आणि गेम विनर होते.


ऋषभ पंतच्या क्रिकेट करिअरमध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2019 च्या नंतर मोठी घसरण झाली होती. 23 व्या वयात ऋषभ पंतला 2020 मध्ये टीममधून बाहेर काढण्यात आलं होत. त्यामुऴे ऋषभ पंतने टेस्ट टीममध्ये जागा मिळवण्यासाठी खूप कष्ट आणि संघर्ष केला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्टमध्ये ही संधी त्याला मिळाली नव्हती. ऋद्धिमान सहाला खेळवण्यात आले होते. मात्र ब्रिसबेन टेस्टमध्ये ऋषभ पंतच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला सीरीजच्या मलिकेत 2-1 अशी आघाडी मिळाली होती.