मुंबई : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या दौऱ्याची सुरुवात या महिन्यात कसोटी मालिकेने होणार आहे. या दौऱ्यापूर्वीच भारतीय क्रिकेटमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. कोहलीने T-20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वनडेचं कर्णधारपद काढून घेतलं आणि दोन्ही फॉरमॅटची कमान रोहित शर्माकडे सोपवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं की, मी कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नये असं वैयक्तिकरित्या सांगितलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी, कोहलीने पत्रकार परिषदेत असं सांगून सर्वांना आश्चर्यचकित केलं की, BCCI कडून कोणीही T20चं कर्णधारपद सोडू नको असं सांगितलं नाही. या आरोपांवर अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.


गांगुलीला आवडतो कोहलीचा एटिट्यूड 


दरम्यान, कोहलीबाबत गांगुलीचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. गांगुली नुकताच गुरुग्राममध्ये एका कार्यक्रमात पोहोचला होता. इथे त्याला कोणत्या खेळाडूचा एटिट्यूड आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गांगुली म्हणाला की, मला विराट कोहलीचा स्वभाव आवडतो, पण तो खूप भांडतो.


स्ट्रेसपासून कसे दूर राहतात गांगुली?


याच कार्यक्रमात गांगुलीला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला की, तो त्याच्या आयुष्यातील तणावावर कसा मात करतो? यावर बीसीसीआय अध्यक्षांनी मजेशीर उत्तर दिले. त्यांच्या आयुष्यात कोणताही ताण नाही. ताण केवळ पत्नी आणि मैत्रीणीच देतात.


संपूर्ण कार्यक्रमादरम्यान भारताचा माजी कर्णधार गांगुली कोहलीच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलले नाही. कोहलीच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याबद्दल ते म्हणाले की, "मला या प्रकरणी सध्या काहीही बोलायचे नाही. आम्ही या प्रकरणात लक्ष घालू. तुम्ही ते बीसीसीआयवर सोडून द्या."