विम्बल्डन : स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानं पहिलंवहिलं विम्बल्डन जेतेपद पटकावलेय. तिनं फायनलमध्ये विजयासाठी फेव्हरिट असलेल्या अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सचा धुव्वा उडवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुगुरुझानं व्हीनसवर 7-5, 6-0 नं अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. पहिला सेट अतिशय चुरशीचा झाला. टायब्रेकरमध्ये गेलेल्या या सेटमध्ये मुगुरुझानं बाजी मारत व्हीनसला बॅकफूटवर नेलं. 


दुस-या सेटमध्येमध्ये मुगुरुझाच्या धडाक्यासमोर व्हीनसचं काहीच चाललं नाही. आणि स्पॅनियार्ड टेनिसपटूनं दुसरा सेट तर 6-0 नं अगदी आरामात जिंकला. आणि विम्बल्डनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 


मुगुरुझाचं टेनिस करिअरमधील हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. विमब्लडन जिंकणारी ती स्पेनची दुसरी महिला टेनिसपटू ठरली. याआधी 1994 मध्ये क़ॉनचिटा मार्टीनेझनं विम्बल्डन जिंकण्याची किमया साधली होती.