नवी दिल्ली : 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचे कोच गॅरी कर्स्टन यांनी विराटचं तोंडभरून कौतुक केलंय. 'विराटमध्ये क्रिकेट शिकण्याची भूक आहे... आणि हीच भूक विराटचा खेळ सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरतेय... याच भुकेनं त्याला सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ खेळाडू बनवलंय' असं कर्स्टन यांनी दिल्लीत म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या प्रस्तावित अकादमीसाठी तरुण टॅलेंटच्या शोधात गॅरी कर्स्टन सध्या दिल्लीत आहेत. या दरम्यान मीडियाशी बोलताना त्यांनी विराटवर स्तुतीसुमनं उधळलीत. आपल्याला विराटसोबत काम करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. यंदाच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात रोमांचक क्रिकेट पाहण्याचीही आशाही त्यांना आहे. 


कोहली महान क्रिकेटर आहे... कारण तो सतत आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मलाही त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. एका महान खेळाडूची चिन्हं आहेत, असंही कर्स्टन यांनी म्हटलंय. 


गॅरी कर्स्टन सध्या आयपीएलमध्ये बंगळुरूशी निगडीत आहेत. परंतु, यंदाच्या वर्षी मात्र बंगळुरूचा खेळ काही फारसा सुधारलेला दिसला नाही. याबद्दल त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मात्र त्यांनी 'माझं या टीमसोबत हे पहिलंच वर्ष आहे... आणि आत्तापर्यंत टीमची सोहत माझ्यासाठी चांगलीच ठरलीय... एका फ्रेंचायजी टीमला आणि एका आंतरराष्ट्रीय टीमला कोचिंग देणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत... आणि मी टीमचा मुख्य कोच नाही... तर असिस्टंट कोच आहे' असं उत्तर दिलंय.