नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंतर गौतम गंभीर देखील महेंद्र सिंह धोनीच्या बचावात उतरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंभीरने म्हटलं की, वेळेला सांभाळणे सोपे असते पण ज्याप्रमाणे धोनी वाईट वेळेतून सुद्धा गेला ते असाधारण आहे.


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (2011-12) यांच्या सोबत झालेल्या सामन्यानंतर शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने खूपच चांगल्या प्रकारे टीमला सांभाळलं. याबाबत गंभीरने त्यांचं खूप कौतूक केलं.


गंभीर म्हणतो ती, मी सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळलो. मला वाटतं सर्वात जास्त मी धोनीच्या कप्तानीमध्ये खेळलो. आम्ही खूप मजा केली. आम्ही एकाच वयाचे आहोत. तो नेहमी मस्त राहतो. त्याने प्रत्येक गोष्टीला खूप सामान्य ठेवलं. जी सर्वात चांगली गोष्ट आहे.


राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी -20 सामन्यात भारताला न्यूझीलंडने पराभूत केले होते. महेंद्रसिंह धोनीला त्या सामन्यामध्ये चांगले शॉट्स नव्हते खेळता आले. यानंतर माजी क्रिकेटपटू आणि इतरांनी देखील त्याच्यावर टीका केली होती.