Gautam Gambhir On IPL : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर नेहमी (Gautam Gambhir) आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे ओळखला जातो. आयपीएलमध्ये (IPL 2024) सध्या गंभीर जरी खेळत नसला तरी त्याच्या रणनितीमुळे आक्रमकतेमुळे त्याची अनेकदा चर्चा होते. आयपीएलमधील यशस्वी कर्णधारामध्ये गौतम गंभीरचं नाव येतं. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. अशातच गौतम गंभीरने आगामी आयपीएलपूर्वी मोठं वक्तव्य केलंय. गौतम गंभीर नेमका कोणत्या फलंदाजाला घाबरायचा? याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला Gautam Gambhir?


आयपीएलमध्ये मी जेव्हा खेळत होतो, तेव्हा मला ना ख्रिस गेल ना एबी डिव्हिलियर्सने झोप उडवली, तर माझी झोप उडवणारा फक्त रोहित शर्मा (Rohit Sharma) होता. रोहित शर्मामुळे मला रात्री झोप येत नव्हती. रोहितसाठी मला प्लॅन ए, प्लॅन बी तसेच प्लॅन सी देखील तयार ठेवावा लागायचा. जर रोहित फॉर्ममध्ये आला तर मला वाटत नाही की कोणीही त्याला कंट्रोल करू शकतो. तो एकमेव फलंदाज होता, ज्याची मला आयपीएलमध्ये भीती वाटायची. इतर कोणत्याही खेळाडूविरुद्ध मला प्लॅन करावा लागला नाही, पण रोहितसाठी मी तो करायचो. 2012 च्या आयपीएलमध्ये रोहितने केकेआरविरुद्ध 109 धावांची खेळी केली, ती खरंच विस्फोटक होती, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.


मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी जेव्हा मी आधीच्या रात्री प्लॅन करायचो, तेव्हा मला रोहितसाठी वेगळे गेम प्लॅन आखावे लागत होते. सुनिल नरेनच्या चार ओव्हर मला कशा वापरायच्या आहेत, याचा मेळ लावावा लागायचा. जर सुनिलच्या 4 ओव्हर संपल्या आणि रोहित क्रिझवर असेल तर एका ओव्हरमध्ये 30 धावा देखील करू शकत होता, त्यामुळे मला नेहमी एक कॅप्टन म्हणून त्याची भीती असायची, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.



दरम्यान, 2008 साली रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा. 2011 साली त्याला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) खरेदी केलं. त्यानंतर 2013 साली मुंबई इंडियन्सची धुरा त्याच्या खांद्यावर आली. रोहित शर्माने मुंबई गाठली अन् नंतर मागे वळून पाहिलंच नाही. एकामागून एक असे 5 आयपीएल ट्रॉफीवर रोहितने मुंबईचं नाव कोरलं. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करताना दिसणार नाही. हार्दिक पांड्याच्या खांद्यावर मुंबईची धुरा सोपवण्य़ात आली आहे.