मुंबई : भारतीय फलंदाज गौतम गंभीर आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निमित्त त्याच्या चाहत्यांप्रमाणेच क्रिकेट विश्वातील त्याच्या सहकार्‍यांनीही ट्विटरच्या माध्यमातून गौतमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हीव्हीएस लक्ष्मण यानेदेखील गौतम गंभीरला शुभेच्छा दिल्या. मात्र यासोबतच एक खास फोटोही शेअर केला. 




गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा फोटो लक्ष्मणने शेअर केला होता. यामध्ये वीरू गौतमच्या कानामध्ये काही बोलत आहे. नेमका हाच प्रश्न लक्ष्मणने ट्विटरवर गौतमला विचारला आहे. 


लक्ष्मणच्या प्रश्नावर गौतम गंभीरनेही खास उत्तर लिहले आहे. 'मी या प्रश्नाचे उत्तर देईन.. हे राज मला उघडायला आवडेल पण ट्विटरवर भाभी नसेल तर... सांग मी असं करू का ?  


नोव्हेंबर २०१६ मध्ये इंग्लंडच्या विरोधात गौतम गंभीर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता पुन्हा गौतमला कधी संधी मिळणार याची सारेच वाट पहात आहेत.