`गंभीर फार काळ टिकणार नाही...`, धोनीची भेट घेतल्यानंतर वर्ल्डकप विनर खेळाडूचं खळबळजनक विधान!
Joginder Sharma on Gautam Gambhir: गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्डचा हिरो बनलेल्या जोगिंदर शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची भविष्यवाणी केली आहे.
Joginder Sharma on Gautam Gambhir: सध्या टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी टीम इंडिया त्यांचा नवा कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली खेळतेय. टीम इंडियाने पहिल्या टी-20 सिरीजमध्ये श्रीलंकेला क्लिन स्विप दिला. दरम्यान कोच म्हणून गंभीरची सुरुवात चांगली झाली. अशातच आता टीम इंडियाच्या माजी खेळाडूने कोच गौतम गंभीर याच्याविषयी मोठं विधान केलं आहे.
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्डचा हिरो बनलेल्या जोगिंदर शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची भविष्यवाणी केली आहे. दरम्यान त्याने केलेलं हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतंय.
काय म्हणाला जोगिंदर शर्मा
गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून फार काळ टिकणार नाही, असं भारताचा माजी वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा यांने म्हटलं आहे. भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 2024 चा T20 वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर गंभीरने राहुल द्रविडच्या जागी कोचपदाची जबाबदारी स्वीकारली.
शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना जोगिंदर शर्मा गंभीरबद्दल म्हणाला, "गौतम गंभीर टीमची धुरा सांभाळणार आहे, पण मला विश्वास आहे की, गौतम गंभीर जास्त काळ टिकू शकणार नाही."
कोच आणि खेळाडूंमध्ये होऊ शकतात मतभेद
जोगिंदर शर्माने प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील मतभेदांबद्दल या पॉडकास्टमध्ये माहिती दिली. तो म्हणाला, "कारण गौतम गंभीरचे स्वतःचे काही निर्णय असतात. त्यामुळे त्याची एखाद्या खेळाडूसोबत मतभेद होण्याची शक्यता असते. मी विराट कोहलीबद्दल बोलत नाही आहे. गौतम गंभीरच्या निर्णय सहसा असे असतात की इतरांना ते आवडत नाहीत."
आयपीएलमध्ये मेंटॉर म्हणून गंभीरची कामगिरी उत्तम
गंभीर आयपीएलमध्ये दोन टीमसाठी मेंटॉर म्हणून काम केलं आहे. गंभीरचा मेंटॉर म्हणून उत्कृष्ट रेकॉर्ड आहे, ज्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सला दोन्ही सिझनमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत केली. याशिवाय त्याने या वर्षाच्या सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचं तिसरं आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं.
जोगिंदर शर्मा याने कोच म्हणून गौतम गंभीरच्या गुणांचं कौतुक देखील केलं आहे. त्याला असं वाटतं की, भारताचा माजी ओपनर त्याच्या कामगिरीचे श्रेय घेण्यासाठी सर्वत्र जाणार नाही. उलट तो मान खाली घालून काम करणार आहे. गौतम गंभीर हा सरळ बोलणारा आहे. तो चापलूसी करणारा नाही. त्याला श्रेय देणारे आम्हीच आहोत. तो त्याचं काम करतो, प्रामाणिक असतो. मुळात तो त्याचं काम मनापासून करतो, तो मोठ्या प्रामाणिकपणे करतो."