मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. बुधवारपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात झाली असून भारताची पहिल्याच दिवशी खराब सुरुवात पहायला मिळाली. अवघ्या 78 धावांवर भारताचा पहिला डाव आटोपला. दरम्यान तिसरा सामना सुरु होण्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर आणि इंग्लंडचे माजी खेळाडू नासिर हुसैन यांच्यात शाब्दिक बाचाबाची पहायला मिळाली. 


नासिर हुसैन यांनी उडवली खिल्ली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी सुनील गावस्कर आणि नासिर हुसैन एका शोमध्ये उपस्थित होते. डेली मेलशी बोलताना नासेर हुसेन म्हणाले होते की, पूर्वीच्या काळातील भारतीय संघाला भडकावण्यासाठी त्रास जायचा. मात्र विराट कोहलीची टीम दुप्पट क्षमतेने चिथावणीला प्रतिसाद देते.


गावस्कर यांचं सडेतोड उत्तर


लाईव्ह कार्यक्रमादरम्यान, सुनील गावसकर यांनी नासिर हुसैन यांनी विचारलं, तुम्ही म्हणालात की या भारतीय संघाला 'बुली' करता येत नाही. मात्र मागील पिढीच्या संघाला हे करणं शक्य होतं. आधीच्या पिढीबद्दल बोलताना, तुम्ही सांगाल का कोणती पिढी? आणि 'बुली'चा खरा अर्थ काय आहे?'


गावस्कर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नासिर हुसैन म्हणाले, "मला वाटतं की यापूर्वी भारतीय संघाने मैदानावर रोष दाखवला नव्हता. अशा परिस्थितीत विराट कोहलीचा संघ दुप्पट मजबूत होतो. मी सौरव गांगुलीला कधीकधी रागावताना पाहिलं आहे, त्याने त्याची सुरुवात केली आणि विराट कोहली त्याला पुढे नेत आहे."


गावस्करांनी टोचले कान


तुम्ही म्हणता की, आधीची पिढी मैदानावर भडकवल्यावर त्रस्त व्हायची. जर तुम्ही नोंद पाहिल्या तर आम्ही 1971 मध्ये जिंकलो. ही माझी पहिली इंग्लंड दौरा होती. 1974, 1979 आणि 1982 मध्ये आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर 1986 मध्ये आम्ही 2-0 ने जिंकलो. मला नाही वाटत माझ्या जनरेशनचे खेळाडू उकसवल्यावर त्रस्त व्हायचे. विरोधी संघाविरुद्ध तुमच्या चेहऱ्यावर उग्रपणा नेहमी दिसला पाहिजे असं नाही.