मुंबई : टीम इंडियाचे माजी खेळाडू लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावाने अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वत: गावस्करच या स्टेडियमचं उदघाटन करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा मान मिळवणारे गावस्कर पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत. याआधी त्यांचं नाव केवळ मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एका स्टॅन्डला देण्यात आलं होतं. 


अमेरिकेच्या लुईसविल केंटकीमध्ये गावस्कर यांच्या नावाने हे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या पूर्वी व्हिव्हियन रिचर्डस स्टेडियम (अॅटीगुआ), ब्रायन लारा स्टेडियम (त्रिनिदाद) आणि डॅरेन सॅमी स्टेडियम ( सेंट लुसिया) या तीन महान खेळाडूंच्या नावानेच स्टेडियम होते. विशेष म्हणजे हे तिन्ही स्टेडियम वेस्ट इंडिजमध्ये आहेत आणि हे खेळाडूही वेस्ट इंडिजमधीलच आहेत. गावस्कर मात्र याला अपवाद ठरले आहेत. 


'टाइम्स ऑफ इंडिया'शी याबाबत बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, ‘ज्या देशाचा प्रमुख खेळ क्रिकेट नाही, अशा देशातील स्टेडियमला नाव देण्यात आलंय, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे’.