कोहलीमुळे प्रेमीयुगूलाची ताटातूट, विराट कुठं फेडणार हे `प्रेम?`
प्रेमीयुगूलाची ताटातूट विराटमुळे, भरस्टेडियममध्ये त्याचा विराट कोहलीवर खणखणीत आरोप...कुठं फेडणार हे `प्रेम?`
मुंबई : आयपीएलचे सामने चुरशीचे सुरू आहेत. 10 टीममध्ये काँटे की टक्कर असतानाच आता आयपीएल दरम्यान एक अजब बातमी आहे. जगभरात कोहलीचे चाहते आहेत त्यात काही नवीन नाही. काही जण तर कोहलीची जीवशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. एका तरुणाला मात्र कोहलीचा जबरदस्त फॅन असणं महागात पडलं आहे.
या तरुणानं आपलं दु:ख एका पोस्टरमधून शेअर केलं. बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामन्यादरम्यान ही घटना समोर आली. बंगळुरूने कोलकाता विरुद्ध सामना 3 विकेट्सने जिंकला. यावेळी कोहलीचा जबरदस्त फॅन असलेल्या एका तरुणाच्या हातात वेगळं पोस्टर होतं.
कोहलीचा फॅन स्टेडियममध्ये पोस्टर घेऊन फिरत होता. माझ्या गर्लफ्रेंडनं मला कोहलीमुळे सोडलं. मी विराट कोहलीला तिच्यापेक्षा जास्त वेळ देत असल्याचं सांगून तिने सोडल्याचं या पोस्टरमध्ये सांगितलं आहे.
भरस्टेडियममध्ये विराट कोहलीमुळे प्रेमी युगुलाची ताटातूट झाली आहे. त्याचं पोस्टर या भावुक झालेल्या तरुणानं स्टेडियमभर फिरवलं आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या पोस्टरवर युजर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.