दुबई : IPL 2021च्या 52व्या सामन्यात हैदराबादने रॉयल चॅलेंजर बंगळूरूवर 4 रन्सने विजय मिळवला आहे. या टूर्नामेंटमधील हा हैदराबादचा तिसरा विजय आहे. दरम्यान या सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनला देण्यात आला आहे. या सामन्यादरम्या न केवळ फलंदाजी तर उत्तम फिल्डींग आणि सुपर कॅचेस घेतल्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित केलं गेलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत बंगळूरूला 142 रन्सचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बंगळूरूसाठी कठीण नव्हतं. उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या ग्लेन मॅक्सवेल मैदानावर उतरला आणि त्याची फलंदाजी पाहता हा सामना बंगळूरू जिंकणार असं पक्क झालं होतं. मात्र हैद्राबादचा कर्णधार केन विलियम्सनने त्याची चपळाई दाखवत सामना आपल्याकडे खेचून घेतला.


विलियम्सनने केलं रन आऊट


आरसीबीची बँटींग सुरु असताना 15व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर देवदत्त पडिक्कलने ऑफ साइडवर शॉट मारला. त्यावेळी त्या बाजूला केन धावत बॉलकडे आला आणि डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्याने बॉल स्टंपकडे थ्रो केला. अगदी अचूक हा थ्रो स्पंटवर लागला आणि 40 रन्सवर असलेल्या मॅक्सवेलची विकेट पडली. 



दरम्यान पड्डीकलच्या चुकीमुळे मॅक्सवेल रनआऊट झाल्याच्या चर्चा आहेत. कारण पडीक्कलने ज्याबाजूला शॉट मारला तिथे केन फिल्डींग करत होता. पडीक्कल शॉट खेळल्यानंतर लगेचच क्रीज सोडून रन काढण्यासाठी धावला. यामुळे मॅक्सवेल देखील त्याच्या कॉलवर नॉन स्ट्राइक शेवट सोडून पुढे गेला. मात्र, मॅक्सवेलला खात्री होती की तो रन आऊट होणार. 


दरम्यान पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळूरूला हा सामना 4 रन्सने गमवावा लागला. या पराभवामुळे बंगळूरूचा कर्णधार विराट कोहली मात्र निराश झालेला दिसला.