फोटोज :`गोल्डन गर्ल` विनेश फोगाटने विमानतळावरच केला साखरपुडा
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास रचला.
मुंबई : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास रचला. विनेशने महिलांच्या ५० किलोग्रॅम फ्रि स्टाईल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या इरी युकीला ६-२ सी मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.
स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक घेऊन इंडोनेशियावरुन भारतात परतली. परताच तिने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी साखरपुडा केला.
रात्री सुमारे १० वाजता तिरंगा लपेटतून विमानतळावर पोहचलेल्या विनेशच्या स्वागतासाठी तिच्या गावातील अनेकांनी गर्दी केली होती. फुलांच्या वर्षावात तिचे स्वागत करण्यात आले. विमानतळाच्या पार्किंग भागात विनेशचा साखरपुडा पार पडला. शनिवारी विनेशचा वाढदिवस असल्याने त्याप्रसंगी केक कटिंगही करण्यात आले.
२४ वर्षीय विनेश फोगाटने सोमवीर राठीसोबत सारखपूडा केला. यावेळेस दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. याप्रसंगी विनेशची आई आणि सोमवीरचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. विनेशने देखील साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा देत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले.
विनेशने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही खबर आपल्या चाहत्यांना दिली.
विनेश आणि सोमवीर दोघेही कुस्तीपटू असून एकत्र रेल्वेत नोकरी करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेच्या नोकरीदरम्यानच या दोघांमध्ये जवळीक वाढली. हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि आता संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचा दोघांनी निर्णय घेतला आहे.
सोमवीर राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असून त्याला राष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्ज मेडल देखील मिळाले आहे.