मुंबई : सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनाला मुंबईकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. शिव्या द्या, टीका करा पण मैदानात सामना पहायाला या असं भाविनक आवाहन भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं केलं होतं. आणि त्याच्या फुटबॉल कारकीर्दीतील 100 व्या सामन्यासाठी स्टेडियम हाऊसफुल्ल असणार आहे. या सामन्याची सगळी तिकीटं विकली गेली आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या कर्णधाराच्या 100 व्या सामन्याला मोठ्या संख्येनं फुटबॉल चाहते स्टेडियममध्ये दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, छेत्रीसाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीनंही चाहत्यांना फुटबॉल सामना पाहण्यासाठी मैदानात जाण्याचं आवाहन केलं होतं.