२ एप्रिलपासून गुगलची ही सेवा बंद होणार, असं डिलीट करा अकाऊंट
२ एप्रिलपासून गुगलनं त्यांची एक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : २ एप्रिलपासून गुगलनं गुगल+ (Google+) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल त्यांची सोशल नेटवर्किंग सर्व्हिस असलेल्या गुगल प्लसमधला डेटा २ एप्रिलपासून डिलीट करणार आहे. याबद्दल गुगलकडून मेसजच्या माध्यमातून युजर्सना माहिती दिली जात आहे. ३१ मार्चच्या आधी युजर्सनी त्यांचा डेटा आर्काइव्हमध्ये सुरक्षित ठेवावा, असं गुगलनं सांगितलं आहे.
दोन आठवड्यांआधीच गुगलने ही माहिती दिली होती. एवढच नाही तर गुगलची आर्काइव्ह टीमही गुगल प्लसमध्ये असलेल्या पब्लिक पोस्टना स्वत:कडे सुरक्षित ठेवणार आहे. पण तुम्हाला स्वत:चा डेटा गुगलच्या आर्काइव्हमध्ये ठेवायचा नसेल, तर तुम्हाला तुमच्या पोस्ट आणि अकाऊंट डिलीट वेळेत डिलीट करावे लागतील.
असं डिलीट करा गुगल प्लस अकाऊंट
- सर्वात आधी तुमचं जी मेल अकाऊंट सुरु करा
- जी मेल सुरु केल्यानंतर स्क्रीनच्या उजव्या बाजूला ९ टिंबांचा एक चौकोन तुम्हाला दिसेल. या चौकोनावर क्लिक केल्यावर तुम्हाला Google+ दिसेल.
- Google+ वर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाऊंट सुरु होईल. अकाऊंट सुरु झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात वरती 'Your Google+ account is going away April 2, 2019. Downloading your Google+ content may take time, so get started before March 31, 2019' असं लिहिलेलं दिसेल.
- या लाईनमध्ये going away आणि get started ला हायलाईट करण्यात आलं आहे. get started वर क्लिक करा. यानंतर नवीन पेज उघडेल.
- या वेबपेजवर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. जर तुमच्या गुगल प्लसमध्ये फोटो, व्हिडिओ आणि इतर महत्त्वाचा डेटा असेल, तर तो सेव्ह करण्यासाठी download all your Google+ Data वर क्लिक करा. यानंतर पुढे सांगितलेल्या सगळ्या स्टेप फॉलो करा.
- जर तुमच्या अकाऊंटमध्ये महत्त्वाचा डेटा नसेल तर Delete your Google+ profile वर क्लिक करा.