मुंबई : टीम इंडियामध्ये खेळण्याचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचं असतं. त्याला या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची संधी जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल करून देत असतं. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी संधी मिळू शकते. खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक नजर असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामात गुजरातकडून शुभमन गिलने तुफान कामगिरी केली. आपल्या झंझावाती फलंदाजीनं धावांचा पाऊस पाडला. त्याचं शतक हुकलं पण त्याच्या तुफानी खेळीचं फळ त्याला लवकरच मिळण्याची शक्यता आहे. 


शुभमन गिलला रोहित शर्मा टीम इंडियामधून टी 20 सामन्यात खेळण्याची संधी देऊ शकतो. सध्या रोहित शर्मा नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यावर भर देत आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं त्याला टीम बांधायची आहे. या सगळ्याचा विचार करता गिलच्या कामगिरीनंतर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होऊ शकतात. 


शुभमन गिलने 59 बॉलमध्ये 96 धावा केल्या. केवळ 4 धावांसाठी त्याचं शतक हुकलं. त्याने 11 चौकार आणि 1 षटकार ठोकून 96 धावा केल्या. त्याची तुफान बॅटिंग पाहून पंजाबच्या बॉलर्सना घाम फुटायची वेळ आली. शुभमन गिलमुळे गुजरातला पंजाबवर विजय मिळवणं शक्य झालं. 


विजयाचं श्रेय जरी शुभमनला मिळालं नसलं तरी त्याच्यामुळे गुजरातला लक्ष्य पूर्ण करता आलं हे विसरून चालणार नाही. त्यामुळे विजयामध्ये राहुल तेवतियापेक्षाही जास्त वाटा हा शुभमन गिलचा आहे.


दिल्ली विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने 46 बॉलमध्ये 84 धावा केल्या होत्या. त्यावेळीही त्याने सर्वांची मन जिंकली होती. आता पुन्हा एकदा शुभमनने चांगली कामगिरी केली आहे. 


अगदी शेवटी-शेवटी गिलने लाँग शॉर्ट खेळण्याऐवजी रन काढण्यावर भर दिला. त्यामुळे गिलला शतक हुकवायचं नव्हतं. मात्र रबाडाने त्याची विकेट काढली आणि गिलच्या शतकाचं स्वप्न अधुरं राहिलं. 


शुभमन गिल दोन वर्षांपासून वन डे टीममधून बाहेर आहे. आयपीएलमध्ये यावेळी त्याची एकूण कामगिरी पाहता त्याला टी 20 साठी रोहित शर्मा संधी देऊ शकतो.