Indian Cricket Team Coach Offer to Virender Sehwag: भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी ओपनर्सपैकी एक असलेला खेळाडू म्हणजे विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag). आपल्या रोकठोक फलंदाजीच्या शैलीमुळे अनेक क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकणारा विरेंद्र सेहवाग 2011 च्या विश्वविजेत्या संघातील सदस्य होता. सेहवागने आपल्या करियमध्ये अनेक विक्रम स्वत:च्या नावाने नोंदवले. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीयाच्या नावावर असलेली सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या सेहवागच्याच नावावर आहे. सेहवागने चेन्नईमधील कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुद्ध 319 धावांची खेळी केली होती. ही खेळी सर्वात वेगवान त्रिशतक ठरलं होतं कारण सेहवागने या धावा 278 चेंडूंमध्ये केल्या होत्या. सर्वात वेगवान 250 धावा करण्याचा विक्रमही 2009 साली सेहवागने मुंबईमधील कसोटीत आपल्या नावे केला होता. त्याने केवळ 207 चेंडूमध्ये 250 धावांपर्यंत मजल मारलेली.


प्रशिक्षक पदाची ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना ठाऊक नसेल पण सेहवागला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (India coach) होण्यासंदर्भातील ऑफर देण्यात आलेली. भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेने (Anil Kumble) प्रशिक्षक पद सोडताना सेहवागकडे ही जबाबदारी स्वीकारणार का याबद्दलची विचारणा झाली होती. मात्र त्यावेळेस सेहवागने नकार का दिला याबद्दलची माहिती नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिली. सेहवागने नकार दिल्याने ही जबाबदारी रवी शास्त्रींकडे (Ravi Shashtri) सोपवण्यात आली होती. याच ऑफर दरम्यान सेहवागला कुंबळे आणि विराट कोहलीसंदर्भातील (Virat Kohli) एक गुपितही बीसीसीआयच्या तत्कालीन अध्यक्षांनी सांगितलं होतं.


कर्णधार पद भूषवता आलं नाही याची खंत?


कर्णधार पद भूषवता आलं नाही याबद्दल खेद वाटतो का असा प्रश्न सेहवागला न्यूज18 इंडियाच्या चौपाल कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सेहवागने, "अजिबात नाही. मी जे काही मिळवलं आहे त्यामध्ये समाधानी आहे. नजफगढसारख्या छोट्या शहरामधील शेतकरी कुटुंबातून पुढे येत मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. माझ्या वाट्याला चाहत्यांचं फार प्रेम, कौतुकही आलं. मला कर्णधारपद मिळालं असतं तरी मला या साऱ्याबद्दल आता वाटतोय तसाच अभिमान वाटला असता," असं उत्तर दिलं.


कोहली-कुंबळेसंदर्भात मोठा खुलासा


मुख्य प्रशिक्षक होण्यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर झालेल्या बैठकीची माहिती सेहवागने दिली. "मी अर्ज केला नसता तर कोहली आणि बीसीसीआयचे अध्यक्ष (BCCI secretary) अमिताभ चौधरी (Amitabh Choudhary) यांनी माझ्याकडे यासंदर्भात विचारणा केली नसती. आम्ही भेटलो. त्यांनी (अमिताभ यांनी) मला सांगितलं की विराट कोहली आणि अनिल कुंबळेचं अजिबात जमत नाहीय. तू प्रशिक्षक पद स्वीकारावं असं कुंबळेला वाटतंय. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळेचं कंत्राट संपुष्टात येईल असंही त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर तू वेस्ट इंडिजला संघाबरोब जाऊ शकतोस, असं मला सांगण्यात आलं," असं सेहवागने सांगितलं.


एकाच वर्षासाठी प्रशिक्षक पद


कुंबळेला जून 2016 साली भारतीय संघाचं प्रशिक्षक पद देण्यात आलं होतं. त्यानंतर एका वर्षाने म्हणजेच 2017 साली कुंबळेचं कंत्राट संपुष्टात आलं. या स्पर्धेत भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर कुंबळेनेच प्रशिक्षक पद सोडलं.