मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. कोहली आज आपला २९वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सन २००८ मध्ये विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणापासूनच विराटने आपली धडाकेबाज खेळी दाखवण्यास सुरूवात केली. त्यामुळे पदार्पणापासून अपवाद वगळता त्याच्या मैदानावरील कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे. क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या विराटने आपली उत्कृष्ट खेळी दाखवून दिली आहे.


विराटने ६० सामन्यांमध्ये ४९.५५च्या सरासरीने ४६५८ धावा केल्या आहेत. त्यापैकी, २०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ५५.७४ च्या सरासरीने ९०३० धावा आहेत. तर, ५४ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने १९४३ धवा केल्या आहेत. यंदाचे वर्ष हे कोहलीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. त्याने या वर्षात आतापर्यंत ६ शतकांच्या मदतीने १४०० हूनही अधिक धावा ठोकल्या आहेत. या काळात त्याच्या धावांची सरासरी ७६.८४ इतका राहिला आहे.


विराटच्या वाढदिवसानिमत्त दिग्गज मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याला शुभेच्छा देताना पाहा कोणी काय म्हटलंय.