टीम इंडियात सूर्यकुमार यादव नाही, हरभजन भडकला
श्रीलंकेविरुद्धची टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धची टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. २०१९ या वर्षात शानदार कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सूर्यकुमार यादवला टीममध्ये स्थान मिळालं नाही. सूर्यकुमार यादवने स्थानिक क्रिकेट, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली, तरी त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही.
टीम इंडियात संधी मिळाली नसली तरी यादवची इंडिया-ए टीममध्ये निवड झाली आहे. पण भारतीय टीममध्ये यादवची निवड न झाल्यामुळे हरभजन सिंग मात्र चांगलाच संतापला आहे.
'सूर्यकुमार यादव नेमका काय चुकला? याचा मी विचार करतोय. सूर्यकुमार यादवनेही इतर खेळाडूंप्रमाणेच रन केल्या आहेत. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा न्याय का?' असा सवाल हरभजनने ट्विटरवर विचारला आहे.
सूर्यकुमार यादवने विजय हजारे ट्रॉफीच्या ४ इनिंगमध्ये ११३ रन आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३९२ रन केले.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० साठी भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह