इंग्रजी शिकता शिकता भज्जी पडला प्रेमात, पत्नीसमोर सांगितला गर्लफ्रेंडचा किस्सा
भज्जीनं पत्नीसमोर सांगितला श्रीलंकाई गर्लफ्रेंडचा किस्सा
मुंबई: टीम इंडिया माजी खेळाडू हरभजन सिंह आणि इंग्रजीचा 36 चा आकडा आहे. इंग्रजी बोलण्याची भीती होती. हरभजन सिंहचं लग्न 15 ऑक्टोबर 2015मध्ये गीता बसरासोबत झालं. या दोघांनी एकमेकांना 7-8 वर्ष डेट केलं आणि त्यानंतर लग्न केलं मात्र त्याआधी हरभजन सिंह इंग्रजी शिकता शिकता एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. या गोष्टीची कबुली त्याने एका मुलाखतीदरम्यान दिली.
'द कपिल शर्मा' कार्यक्रमात हरभजन सिंहने आपल्या पत्नीसमोर गर्लफ्रेंडची कबुली दिली. हरभजन सिंह एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. 'ती श्रीलंकेची होती. ही तरुणी त्याला इंग्रजी शिकण्यात मदत करायची. तिच्यामुळे माझ्या मनातील इंग्रजीची भीती थोडी कमी झाली. तिच्यासोबत बोलता बोलता मला थोडं इंग्रजी जमायला लागलं. तिचं इंग्रजी ऐकून मी तसं बोलण्याचा प्रयत्न करायचो.'
विराट कोहलीला धक्का | जवळच्या व्यक्तीची अचानक तब्येत बिघडल्यानं निधन
गीता त्याच्याकडे पाहिलं पण हरभजनने आपली गर्लफ्रेंड होती असं मुलाखतीदरम्यान कबुल केलं. गीता हरभजनसोबत रिलेशनमध्ये येण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हती मात्र सगळ्या मित्रांनी समजवल्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. गीता आणि हरभजन सिंह यांनी 2015 मध्ये लग्न केलं.