एली अवराम आणि हार्दीक पांड्या या ठिकाणी पुन्हा दिसले एकत्र...
क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे जूनेच.
मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते तसे जूनेच. विरुष्कानंतर आता टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता ही बातमी पक्की होऊ लागली आहे. कारण अनेकदा या दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे.
पुन्हा एकदा एकत्र स्पॉट
रविवारी रात्री या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट करण्यात आले. हार्दिक पांड्या आणि एली अवराम यांना हाकीम अलीम सलोनमध्ये एकत्र पाहण्यात आले. फोटोग्राफर्सने फोटो काढायला सुरुवात करताच एली कारमध्ये बसली व तिने आपला चेहरा लपवायला सुरुवात केली.
सेलिब्रेटींची पसंती
हाकीम अलीम सलोनला अनेक सेलिब्रेटींनी आपली पसंती दर्शवली आहे. अलीकडेच विराट कोहलीने देखील याच सलोनमधून आपली हेअरस्टाईल बदलली. तो फोटो विराटने आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला होता.
यावरून येते प्रचिती
यापूर्वी एली अवराम आणि हार्दिक पांड्या या दोघांना एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आले. त्याचबरोबर हार्दिक पांड्या जाहिरातीचे शूटिंग करत असताना देखील बॉलिवूडची ही अभिनेत्री तेथे उपस्थित होती. या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या असताना हे दोघे एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करताना दिसत आहेत. त्याचबरोबर पांड्याच्या काही पोस्टवर एलीच्या रिअॅक्शन त्यांच्या काहीतरी सुरू असल्याची प्रचिती देतात.