मुंबई :  चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्यापूर्वी विराट कोहलीने धोनीबद्दल मोठे विधान करून अनेक शक्यता व्यक्त केल्या आहे. त्यांच्या या विधानावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या १ जूनपासन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये  भाग घेण्यासाठी टीम इंडिया इंग्लड पोहचली आहे. बुधवारी इंग्लडला रवाना होण्यापूर्वी विराटने एक पत्रकार परिषद घेतली. त्यात विराट म्हटला की, टीमचा मध्यक्रम मजबूत झाला आहे. त्यामुळे धोनीवर मॅच फिनिश करण्याचा दबाव कमी झाला आहे. 


कोहली म्हणाला, आम्ही खालच्या मध्यक्रमाचे योगदान मजबूत करू इच्छित आहे.  गेल्या दोन वर्षांपासून धोनीवर खूप दबाव होता. त्यामुळे आम्हांला वाटते की तो स्वतःला व्यक्त करण्यात कमी पडत होता. खाली फिनिशनर नाही त्यामुळे तो खेळण्यात संयम दाखवतो. 


या काळात आता केदार जाधव आणि हार्दिक पांड्या चांगल करीत आहे. त्यामुळे आमच्या संघ मजबूत झाला आहे. त्यामुळे आम्हांला खूप संतुलन मिळाले आहे. 


आम्हांला या विभागात सुधार करण्याची गरज होती इंग्लड विरूद्ध सिरीजमध्ये आम्हाला पांड्या आणि जाधवमुळे फायदा झाला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आम्ही मजबूत स्थिती आहे.