मुंबई : यंदाच्या सिझनमध्ये टॉपला असलेल्या गुजरात टायटन्सच्या टीमला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाब किंग्सने गुजरातचा 8 विकेट्सने पराभव करत पॉईंट्स टेबलमध्ये पाचवं स्थान गाठलं आहे. गुजरातचा हा यंदाच्या सिझनमधील दुसरा पराभव होता. दरम्यान या सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने एक धक्कादायक विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्या फ्लॉप ठरला. त्यानंतर सोशल मीडियावर पांड्याला ट्रोल करण्यात आलं. पंजाबने 144 रन्सचं आव्हान दिलं. मात्र गुजरातला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. पंजाबने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.


सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, "टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला कारण कठीण परिस्थितीत टीमला पहायचं होतं. अशा परिस्थितीत टीम कसं काम करते हे पाहिलं. मला माहिती होतं की, नवा बॉल वेगळं काहीतरी करू शकतो. पण, तुम्ही सतत विकेट्स गमावत राहाल तर तुमच्यावर दडपण येईल. हा पराभव मी धडा म्हणून घेईन."


आम्ही कन्फर्ट झोनमधून बाहेर येऊ आणि चांगला काम करू. आम्ही नेहमी चांगली कामगिरी करण्याबाबत बोलत असतो. पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा आमचा फोकस असेल. आमच्याकडे आता वेळ आहे आणि आता आम्ही पुढच्या सामन्यासाठी तयारी करतोय, असंही पंड्याने सांगितलं आहे.