हार्दिकच्या टीममधील बॉलरचा जलवा, 4 बॉल 4 विकेट्स घेणारा हा बॉलर कोण?
पंजाबने खेळण्याची संधी नाकारली आता असा काढला वचपा, पाहा कोण `तो` खेळाडू
मुंबई : आयपीएलमध्ये धावांचा डोंगर उभा करूनही पंजाबला फुटला. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं गेम झाला. राहुल तेवतियाने 2 बॉलवर षटकार ठोकून गुजरातला सामना जिंकून दिला. तर बॉलर्सनी पंजाबच्या फलंदाजांची दणादाण उडवली.
हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. विजय शंकर आणि वरुण एरॉन दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्य जागी दोन जणांना डेब्यूची संधी मिळाली. दर्शन नालकंडे आणि साई सुदर्शनने आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळत डेब्यू केलं.
पदार्पणातच दर्शनचा जलवा पाहायला मिळाला. याआधी दर्शन पंजाब टीममध्ये होता मात्र त्याला खेळण्याची संधी देण्यात आली नाही. गुजरात टीमने मेगा ऑक्शनमध्ये 20 लाख रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतलं.
दर्शनने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही तुफान कामगिरी केली होती. त्याने 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या. आता दर्शननं आयपीएलमध्ये गुजरातकडून बॉलिंग करत पंजाबच्या 3 फलंदाजांना तंबुत पाठवलं. गुजरातला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे.