Hardik Pandya : सध्या टीम इंडिया ( Team India ) वेस्ट इंडिज विरूद्ध टी-20 सिरीज खेळतेय. या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजने 2-1 अशी आघाडी घेतलीये. दरम्यान पहिले दोन सामने गमावल्यानंतर या सिरीजच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) कमबॅक करत पहिला विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) अनेक प्रकारच्या टीका करण्यात आल्या. यावरून आता टीम इंडियाच्या एका दिग्गजाने देखील हार्दिकवर मत मांडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी वनडे वर्ल्डकप पाहता नियमित कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) यांना टी-20 सिरीजमधून आराम देण्यात आला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे सोपवण्यात आली आहे. तिसऱ्या सामन्यानंतर हार्दिकच्या एका कृत्याने त्याच्यावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका करण्यात येत होती.  


वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यानंतर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) ने तिलक वर्माला ( Tilak Verma ) अर्धशतक झळकावण्याची संधी न दिल्याने त्याच्यावर बरीच टीका झाली. झालं असं की, तिलक वर्मा 49 रन्सवर फलंदाजी करत असताना स्ट्राईकवर असलेल्या पांड्याने सिक्स लगावत सामना संपवला आणि भारताला विजय मिळवून दिला. 


दिग्गज खेळाडूने हार्दिकवर मत मांडलं आहे


टीम इंडियाचा माजी ओपनर आकाश चोप्रा यांनी तिलक वर्माच्या प्रकरणावर त्यांचं मत मांडलं आहे. आकाश यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, 'या प्रकरणानंतर हार्दिकला ( Hardik Pandya ) खूप ट्रोल केले गेले आणि टीका केली गेली. मला आठवतं की, एकदा एमएस धोनीने डिफेंसिव शॉट खेळला होता. याचं कारण  म्हणजे विराट कोहली दुसऱ्या टोकाला होता आणि धोनीला विराटला सामना संपवायला द्यायचा होता. त्याला लाइमलाइट घ्यायचा नव्हता. अशावेळी हार्दिकला धोनी बनण्याची गरज नाही, जरी तो त्याला आपला आदर्श मानतो.


तिलक वर्माच्या खेळीची स्तुती


आकाश चोप्रा पुढे म्हणाला, 'तिलक वर्माने सध्या उत्तम कामगिरी करतोय. तिलकने पहिल्या तीन आंतरराष्ट्रीय डावात 30 पेक्षा जास्त रन्स केले. असं करणारा तो पहिला भारतीय देखील आहे. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. त्यानंतर को अर्धशतकाच्या जवळ होता, खरं तर हे अर्धशतक पूर्ण व्हायला हवे होतं.