मुंबई : आयपीएलचा 24 वा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात गुजराने राजस्थानवर 37 रन्सने विजय मिळवला. गुजरातचा हा चौथा विजय होता. दरम्यान या सामन्यात हार्दिक पंड्या फार चर्चेत होता. यावेळी त्याच्या खेळीमुळे नव्हे तर त्याच्या फीटनेसवरून चर्चा रंगली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र अशावेळी त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कारण राजस्थान फलंदाजी करत असताना 18व्या ओव्हरमध्ये तो त्याच्या फिटनेस चांगलं नसल्याचं दिसून आलं. यानंतर हार्दिकने मैदान सोडले आणि डगआऊटमध्ये पोहोचला.


गेल्या वर्षी खराब फॉर्ममुळे निशाण्यावर असलेल्या पांड्याने आयपीएल 2022 च्या सिझनमध्ये चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. कालच्या सामन्यात त्याने केवळ कर्णधारपदाची खेळीच खेळली नाही तर त्याच्या गोलंदाजी, फिल्डींगनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. मात्र सध्या प्रश्न केवळ हार्दिकच्या फिटनेसचा आहे.


ज्यावेळी हार्दिकने मैदान सोडलं त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावेळी त्याच्या फीटनेस चांगला असेल अशी आशा चाहत्यांकडून करण्यात येतेय.


गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 37 रन्सने पराभव करत चौथा विजय नोंदवला. यासह गुजरातने पॉईंट्स टेबलने अव्वल स्थान पटकावलंय. या सामन्यात गुजरातच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. गुजरातच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. गुजरातकडून यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतले.