मुंबई : आयपीएलकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. यंदा नव्याने आलेल्या गुजरात टीमने उत्तम कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याने आयपीएलआधी खराब कामगिरीमुळे ब्रेक घेतला होता. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी अव्वल ठरत आहे. गुजरात टीम पॉईंट टेबलवर टॉप आहे. गुजरातचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आहे. त्यामुळे त्याची एकूण कामगिरी पाहता हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठीचा पुढचा दावेदार असू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या खराब स्थितीनंतर रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत रोहितच्या जागी लवकरच एक नवा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार होईल, असा अंदाज एका अनुभवी खेळाडूने व्यक्त केला.


गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. गुजरातच्या यशात कर्णधार हार्दिकचा मोठा वाटा आहे. हार्दिकच्या प्रभावी खेळणं पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर र ब्रॅड हॉगने भविष्यवाणी केली. हार्दिक पांड्या येत्या 2 वर्षात टीम इंडियाचं नेतृत्व करेल असं त्याने भाकीत केलं. 


हॉगने आपल्या यूट्यूब चॅनलवर याबाबत माहिती दिली. तो म्हणाला गुजरात टायटन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. मला वाटतं की तो आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे. त्याचे निर्णय त्याची शैली आणि क्षमता पाहता तो पुढे टीम इंडियाचं नेतृत्व चांगलं करू शकतो असं भाकीत व्यक्त केलं आहे. 


टीम इंडियामध्ये पुनरागमन करणं माझ्या हातात नाही पण सध्या माझं लक्ष्य फक्त आयपीएलच्या ट्रॉफीवर असल्याचं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे. मी खेळतो तेव्हा फक्त माझं लक्ष त्या सामन्यावर असतं. हार्दिक पांड्या दुखापतीनंतर टीम इंडियातून बाहेर होता. त्याच्या खराब फॉर्म आणि दुखापत यामुळे त्याला पुन्हा संधी दिली नव्हती.


हार्दिक पांड्याने एक ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. ब्रेकनंतर तो फुल्ल फॉर्ममध्ये आयपीएलच्या मैदानात उतरल्याचं दिसलं. हार्दिक पांड्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही असल्याचं पाहायला मिळत आहे.